रॅली काढणे” गुलाल उधळणे ‘ पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके उडवल्यास होणार गुन्हा दाखल.
रॅली काढणे” गुलाल उधळणे ‘ पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके उडवल्यास होणार गुन्हा दाखल.
इंदापुर द 17 प्रतिनिधि-महेश गडदे.
पुणे ग्रामीण जिल्हयात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली आहे. या निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दिनांक १८ जानेवारी रोजी होणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणी नंतर विजयी गटातील उमेदावर किंवा त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हे मोठया प्रमाणात एकत्रित येवून ते आपल्या विजयी उमेदवाराची विजय मिरवणुक / रैली काढणे, पराभुत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडणे, विरोधी गटातील कार्यकर्ताच्या अंगावर गुलाल उधळणे, परवानगी शिवाय बॅनर / फ्लेक्स लावणे या घटनेवर बंदी घालण्यात आली आहे.
या गोष्टींमुळे दोन गटांमध्ये किंवा दोन जातींमध्ये, धर्मामध्ये सुदधा वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेकरीता व नागरीकांना मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे या गोष्टींना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हयात दि.१८ जानेवारी रोजी ००:०० वाजले पासून २४:०० वा. दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि मतमोजणी नंतर पुणे ग्रामीण जिल्हयात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आली आहे.
असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित शासकीय विभागांना दिले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा