राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मतदानाचा हक्क बजावत केले मतदान ,नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन।


राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मतदानाचा हक्क बजावत केले मतदान ,नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन।



 इंदापुर १५ डिसेंबर// 

प्रतिनिधि -महेश गडदे

निवडणूक म्हणजे जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देणारा लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही भक्कम करणे गरजेचे आहे सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करत राज्याचे बांधकाम वन राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील आपल्या भरणेवाडी या गावी कुटुंबातील सदस्यांसह गावातील इतर नागरिकांसोबत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

इंदापूर तालुक्यात ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.६० पैकी ३ ग्रामपंचायत बनविरोध झाल्या असून उर्वरित ५७ ग्रामपंचायतीचे आज दि.१५ रोजी प्रत्यक्षात मतदान होत आहे. ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात उतरले असून आज मतपेठीत त्यांचे भविष्य बंद होणार आहे.

आज सकाळ ७:३० वाजे पासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

इंदापूर तालुक्यात मतदान प्रक्रिया शांत स्थितीत सुरू असून;पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.