कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन,


कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन, 



इंदापुर दि, प्रतिनिधि- महेश गडदे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्याचसोबत दिवाळीचा सण साजरा करत असताना आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.


मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या वर्षी मी स्वत: केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्विकारणार आहे. तसंच भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्या घरी हा सण साजरा करणार आहे.


ते पुढे म्हणाले, “कोरोनाला सणवार किंवा दिवाळी कळत नाही. त्यामुळे लस ज्यावेळी येईल आणि आपल्याला मिळेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणं आणि हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे.”


“दिवाळीच्या सणाच्या काळात जर आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडे रुग्णसंख्या बेसुमार वाढेल आणि खूप कठीण आव्हान बनेल हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं.” असंही मुख्यमंत्री म्हणालेत.


           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.