मुख्यमंत्री पद मी ब्राम्हणाला दान म्हणून दिल; एकनाथ खडसेंचा फडणवीसांना टोला.
मुख्यमंत्री पद मी ब्राम्हणाला दान म्हणून दिल; एकनाथ खडसेंचा फडणवीसांना टोला.
प्रतिनिधि -महेश गडदे.
राज्यातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्या पासून ते भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एक ही संधी सोडली नाही.आता देखील मुक्ताई नगर मध्ये बोलत असताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजप बरोबर देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशी खंत देखील एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा