मुख्य सामग्रीवर वगळा

हर्षवर्धन पाटील यांची कर्मयोगीच्या इंदापूर येथील साखर वाटप केंद्रास अचानक भेट.

इंदापुर दि, प्रतिनिधि; महेश गडदे.

माजी मंत्री व कर्मयोगी शंकररावजी  पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.5) अचानकपणे इंदापूर येथील कारखान्याच्या सभासद साखर वाटप केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्डधारकांशी संवाद साधला.

         

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी कारखान्याच्या इंदापूर येथील साखर वाटप केंद्रास अचानक भेट दिली.

कर्मयोगी कारखान्याचे इंदापूर गटाचे साखर वाटप केंद्र हे शहरांमध्ये हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाच्या इमारतीमध्ये आहे. अकोले येथून इंदापूर शहरात येताना हर्षवर्धन पाटील यांनी अचानकपणे या साखर वाटप केंद्रास भेट दिली. या केंद्रावर सध्या कारखान्याच्या कार्डधारकांना दिवाळीसाठी साखर वाटप सुरू आहे. येत्या 25 नोव्हेंबर पर्यंत साखर वाटप केंद्र सुरू राहणार आहे. यावेळी कार्डधारकांना ओळीत जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून तात्काळ आणखी एक वजन काटा वाढविण्याचे आदेश हर्षवर्धन पाटील यांनी संबंधितांना दिले. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सिंग  पाळावे, गर्दी करू नये अशा सूचना  हर्षवर्धन पाटील यांनी कार्डधारकांशी संवाद साधताना केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.