यंदाची दिवाळी महालात नाही तर साजरी कराणार मेंढपाळांच्या पालात :-डॉ शशिकांत तरंगे.
इंदापुर दि. प्रतिनिधि- महेश गडदे.
दिवाळी सारखा संपूर्ण कुटुंबाला एकत्रित येऊन आनंद देणारा सण देशभरामध्ये अतिशय उत्साही मध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये हा सण साजरा केला जातो .
परंतु माझ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधव हे आपल्या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी महाराष्ट्राच्या तसेच परराज्यातही ही मेंढपाळांना घेऊन आपल्या या छोट्या-छोट्या लेकरांना, बाळांना घेऊन त्यांची भटकंती करत असतात त्यांना खऱ्या अर्थाने कोणताही सण हा इच्छा असूनही साजरा करता येत नाही ज्या गावात जाईल त्या गावातल्या अनेक गाव गुंडा बरोबर संघर्ष करण्यातच त्यांचा दिवस जात असतो.
प्रचंड मानसिक विकृतीचा सामना करुन मान-अपमान सहन करत त्यांना आपल्या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व पोटाच्या खळगी भरण्यासाठी रोज मजल दरमजल भटकंती ही त्यांचा जणू पाचवीलाच पुजलेले असते परंतु त्यांच्या जीवनामध्ये ही कुठेतरी आनंदाचा क्षण साजरा केला पाहिजे
त्यांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा आनंद आपण दिला पाहिजे दिवाळी सारखा अतिशय उत्साही आनंदी सण या मेंढपाळांना साजरा करता येत नाही हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही ही सामाजिक परिस्थिती न बदलल्यामुळे झालेलं फार मोठं नुकसान आहे सरकारचं अपयश आहे.
आणि म्हणूनच मेंढपाळांना दिवाळी सारखा सणाला व आनंदाला ही मुकावे लागत आहे.
म्हणून *डॉ शशिकांत तरंगे समन्वयक धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.
संपूर्ण राज्यातील धनगर समाज बांधवांना आव्हान करत आहेत कि या दिवाळीला सर्वांनी आपल्या-आपल्या भागातील मेंढपाळ बांधवां आलेले आहेत त्या मेंढपाळांना संपर्क करून त्यांच्याबरोबर आपण दिवाळी साजरी करायची आहे. त्यांच्या पालावरती जाऊन त्यांच्या कुटुंबियांबरोबर दोन घास दिवाळीचे चकली, लाडू, करंजी, चिवडा यासह दिवाळीचे गोड पदार्थ त्यांना फराळ म्हणून देयचे तसेच या मेंढपाळ माता-भगिनींना एक भाऊ म्हणून साडी,चोळी देऊन भाऊबीज साजरी करायची आहे
तसेच लहान चिमुकल्यांना एखादा ड्रेस कपडे, फटाके त्यांच्या चिमुकल्यांना आपण देऊन त्यांच्या जीवनामध्ये काही क्षण का होईना पण त्यांच्या पाला वरती जाऊन त्यांच्या सोबत आनंद देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा*
शेवटी जीवनामध्ये प्रत्येकांच्या संघर्ष हा करावाच लागतो परंतु या भटकंती करणाऱ्या मेंढपाळ बांधवांना आपण मायेचा आधार आणि आपलेपणाची जाणीव करून दिली तर निश्चितपणे त्यांनासुद्धा कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांचाही कोणतरी आधार वाड आहेत असल्याची जाणीव आपण करून देऊ शकता यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव आपल्या आपल्या तालुक्यात भागात जिथे जिथे भटकंती करत आलेले मेंढपाळ आहेत त्या सर्वांना संपर्क करा व दिवाळीचा एक दिवस मेंढपाळांच्या पाला वरती साजरा करा हाच उपक्रम धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य वतीने राज्यभर राबविण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा