भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याचा उस दर जाहीर; वाचा सविस्तर.
भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याचा उस दर जाहीर; वाचा सविस्तर
इंदापुर दि. प्रतिनिधि ;महेश गडदे
दिवाळीच्या सणासाठी कामगारांना बोगस व सानुग्रह अनुदानापोटी 10 टक्के रक्कम देण्याचाही महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत ही घेण्यात आला.
वालचंदनगर ,भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०१९-२० गळीत हंगामामध्ये गाळप केलेला उसाचा अंतीम दर २५०० रुपये प्रतिटन जाहीर केला असून दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर प्रतिटन १४० रुपयांचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
उसाच्या अंतीम दर व धोरणात्मक निणर्यासाठी आज बुधवार (ता. ४) रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली. कारखान्याने २०१९-२० गळीत हंगामामध्ये ४ लाख १७ हजार ४२५ मेट्रीक टनाचे गाळप केले होते. सरासरी १०. ४५ रिक्व्हरी बसली असून ४ लाख ३५ हजार ६०० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे.
ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता २४७२ रुपये ९७ पैसे एफआरपी ची रक्कत आहे. सभासदांचा उस गाळप सुरु असताना कारखान्याने २१०० रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. तसेच गेल्या दहा दिवसापूर्वी २५० रुपये प्रतिटनाने कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर जमा केला आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये कारखान्याने २५०० रुपये प्रतिटनाचा अंतीम दर जाहीर केला आहे.
भागविकास निधीपोटी कारखाना प्रतिटन १० रुपयांची कपात करणार असून दिवाळीपूर्वी १४० रुपये प्रतिटनाप्रमाणे सभासदांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.कामगारांना १० टक्के बाेनस...
दिवाळीच्या सणासाठी कामगारांना बोगस व सानुग्रह अनुदानापोटी 10 टक्के रक्कम देण्याचाही महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत ही घेण्यात आला.
१२ लाख टन उस गाळपाचे उद्ष्ठि...
चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे ९ लाख मेट्रीक टन उसाची उपलब्धता आहे.तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील सुमारे 3 लाख मेट्रीक टन गेटकेनचा उस असून १२ लाख मेट्रीक टनाचे उद्ष्ठि ठेवले आहे. कारखान्याची दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने चालणार असून २५ हजार मेट्रीक टनाचे गाळप झाले आहे. सर्व सभासदांनी आपला उस कारखान्याकडे गाळपासाठी देण्याचे आवाहन अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील व संचालक मंडळाने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा