शासकीय अधिकारी व कर्मचारी हे कार्यालय कामकाजाच्या वेळेत ऑफिसच्या बाहेर कामानिमित्त जाताना नोंद करत नाहीत:जनार्धन पांढरमिसे,

शासकीय अधिकारी व कर्मचारी हे कार्यालय कामकाजाच्या  वेळेत ऑफिसच्या बाहेर कामानिमित्त जाताना नोंद करत नाहीत:मुख्यमंत्री यांना निवेदन 


श्री.जनार्धन विठ्ठल पांढरमिसे -भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास मा. अण्णा साहेब हजारे प्रणित 


इंदापुर.दि -प्रतिनिधि महेश गडदे, 

शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे कार्यालय कामकाजाच्या दिवशी वेळेत ऑफिसच्या बाहेर कामानिमित्त गेलेत असे सांगून जातात त्याबाबत नोंद करण्यासाठी शासनाने एक रजिष्टर प्रत्येक शासकीय व निमशासकिय कार्यालयामध्ये ठेवण्याची  तरतूद करावी.

           शासकीय कार्यालयामध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेमध्ये ऑफिसमध्ये हजर नसतात . अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. व काही वेळेस थांबून राहावे लागते.कार्यालयातील  कोणत्याही कर्मचाऱ्याला व अधिकाऱ्यांना माहीत नसतं की साहेब कुठे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाईलाजाने दिवसभर  थांबून राहावं  लागते . 

खरंतर अधिकारी हे ऑफिसच्या  कामानिमित्त न जाता ते कोणत्यातरी समारंभाला किंवा त्यांच्या वैयक्तिक कामाला गेलेले असतात त्यामुळे त्या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे एकमेकांना सामील व संगंनमताने  असतात त्यामुळे ते कार्यालयामधे येणाऱ्या नागरिकांना खरं काय काहीही  कारणे सांगितले जातत. 

अशे गंभीर आरोप भ्रष्टाचार विरोध जन आंदोलन न्यासाचे पुणे जिल्हा संघटक -जनार्धन पांढरमिसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या निवेदना मध्ये केले आहेत,  शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाइलाजानं हेलपाटे मारावे लागतात.

म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक रजिष्टर असावे व ते रजिष्टर त्या कार्यालयामध्ये येणार्या नागरिकांना पहाता येईल आशा ठिकाणी ठेवावे. दर्शनी भागामध्ये ठेवावे, शासनाकडे  अशी एक मागणी जनार्धन पाांढरमिसे यांनी केली आहे .

प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे शासकीय मोबाईल नंबर असावेत. व ते कायम त्या ठिकाणी त्या पदासाठी  देण्यात यावेत जेनेकरुण बदली होऊन येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना तो नंबर व कार्ड दिले जावे. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय  होणार नाही. होणारे हेलपाटे व वाया जाणारा वेळ वाचू शकेल अशी मागणी हि करण्यात आली .

 अधिकारी व कर्मचारी हे ऑफिसला आज येणार आहेत की नाहीत. हे सर्व सर्वसामान्य नागरिकांना कळेल  व अशा मोबाईल व संपर्क ची यादी व फलकावर  प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागांमध्ये लावण्याचे आदेश  दिले जावेत या मागणीचा विचार मा. मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे  यांनी करावा अशी मागणी  भ्रष्टाचार विरोध जन आंदोलन न्यास मा. अण्णा साहेब हजारे प्रणित संघटणेचे पुणे जिल्हा संघटक जनार्धन पांढरमिसे यांनी केली आहे.

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.