शुभ मुहूर्तावर सोनाई कडून दिवाळीचे गिफ्ट मागिल हप्ता १५० तर चालू हंगामासाठी २००० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.
इंदापुर, प्रतिनिधि -महेश गडदे,
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याने मागील वर्षी सन २०१९-२० साली गाळप केलेल्या ऊसाला १५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून सण २०२०-२१ च्या ऊसतोड हंगामा साठी उसाला दोन हजार रुपये प्रमाणे बँक खात्यामध्ये जमा केले असल्याची माहिती सोनाई कारखान्याचे संचालक प्रवीण माने यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले की सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ दादा माने यांनी घालून दिलेल्या तत्त्वावर वाटचाल करत सोनाई परिवाराची यशस्वी वाटचाल सुरू आहे, सर्व शेतकरी बांधव कर्मचारी व वाहतूक कर्मचारी या सार्यांच्या साथी ने सोनाई ची वाटचाल अविरतपणे पुढे चालू राहील असा विश्वास यावेळी प्रवीण माने यांनी व्यक्त केला.
सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना हा गुळ निर्मिती करतो. बाजारपेठेत गूळ व साखरेच्या दरात नेहमीच तफावत असते तरीसुद्धा आजुबाजूच्या कारखान्याच्या तुलनेत दर देण्याचा प्रयत्न सोनाई नेहमीच करत असतो.
यंदाच्या हंगामात एक लाख सत्तर हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध आहे शेतकरी बांधवांच्या सर्व उसाचे गाळप करून उत्तम दर देण्याचे यावेळी प्रवीण माने यांनी जाहीर केले असून सर्व शेतकऱ्यांनी सोनाई कारखान्यांला ऊस घालण्याचे आवाहन माने यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा