लोणी देवकर औद्योगिक क्षेत्र विकासाबाबत सकात्मक चर्चा कंपनी विस्तारीकरणावर भर -राज्य मंत्री दत्तात्रय भरणे .


लोणी देवकर औद्योगिक क्षेत्र विकासाबाबत सकात्मक चर्चा - मंत्री दत्तात्रय भरणे 


 इंदापुर दि. प्रतिनिधि; महेश गडदे.


इंदापूर तालुक्यामधील तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे प्रयत्न करताना दिसत आहेत. आज मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी राज्यमंत्री आदीती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इंदापूर येथील लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रामध्ये नवस्थापित होणाऱ्या कंपनीच्या उभारणीबाबत सकारत्मक चर्चा झाल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संगितले. 

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रात नव्याने सुरू होणाऱ्या Certoplast india pvt.Ltd. या कंपनीच्या स्थापनेबाबत उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते.यांशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुकादम, प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, उद्योग संचालनालायचे सह सचिव संजय देगावकर व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी हे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सामिल झाले होते .

लोणी देवकर औद्योगिक क्षेत्र विकासाबाबत सकात्मक चर्चा - मंत्री दत्तात्रय भरणे 

 ॵदोगिक वसाहती बाबत बाबत बोलताना भरणे म्हणाले कि इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत नव्याने स्थापन होणा-या कंपनी बाबत राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी कायदेशीर बाबी तपासून विभागामार्फत कार्यवाही जलद होण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. वन पाइंट विंडो अंतर्गत राज्यात देश-विदेशातून येत्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्याअनुषंगाने या औद्योगिक वसाहतीत नव्याने सुरु होणाऱ्या विविध उद्योगधंद्यांसाठी माझे सातत्त्याने प्रयत्न असतील. तालुक्यात औद्योगिकरण वाढले तर युवा पिढीच्या हाताला रोजगार मिळेल. तालुक्याचा लोकप्रतिनीधी व सरकारचा मंत्री म्हणून माझे यासाठी कायम प्रयत्न असतील.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.