9 वी ते 12 वी चे वर्ग होणार सुरु. कोरोना चाचणी साठी शिक्षकांची गर्दी.

कोरोना चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर शिक्षकांची झुंबड; रुग्णालय स्टाफची ताराभळ.  
              

                         









इंदापुर ,दि.प्रतिनिधि -महेश गडदे.

https://youtu.be/15Jx2GeSqgY


 कोरोनामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा व कॉलेज सोमवार (२३ नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

 या पार्श्वभूमीवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाबाहेर इंदापूर तालुक्यातील शिक्षकांची झुंबड उडाली होती. मात्र चाचणीसाठी अचानक झालेल्या गर्दीमुळे रुग्णालयातील टेक्निशियन विभागाची तारांभळ उडाल्याचे दिसले.

तब्बल ८ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा बंद होत्या. मात्र २३ नोव्हेंबर पासून मुले पुन्हा शाळेची पायरी चढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने सुरूवातीला केवळ ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांना कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) मोफत मात्र बंधनकारक करण्यात आली आहे, याशिवाय शिक्षकांना शाळेची पायरी चढता येणार नाही.

 तर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. शिवाय हमिपत्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहेत. 

https://youtu.be/15Jx2GeSqgY

या पार्श्वभूमीवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आज (१९ नोव्हेंबर) सकाळपासूनच कोरोना चाचणी करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शिक्षकांनी गर्दी केली होती. 

मात्र विना सूचना अनपेक्षितरित्या झालेल्या या गर्दीमुळे मागील ८ महिन्यांपासून आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या टेक्निशियन विभागातील कर्मचाऱ्यांची तारांभळ उडाल्याचे दिसले. इंदापूर तालुक्यातील शिक्षकांना चाचणीसाठी इंदापूर, भिगवण आणि वालचंदनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत चाचणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

याशिवाय शाळा निर्जंतुक करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा जबाबदाऱ्या शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.