उठ मतदारा जागा हो लोकशाहीचा तू धागा हो, प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.
उठ मतदारा जागा हो लोकशाहीचा तू धागा हो, प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे. इंदापूर, भवानीनगर.( प्रतिनिधी, महेश गडदे)ता.१४: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री. छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय, भवानीनगर, ता.इंदापूर, जि. पुणे येथे गुरुवार दि- 14 सप्टेंबर 2023 रोजी विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नव मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे हे होते. यावेळी मंडलाधिकारी डी .व्ही. कावळे व तलाठी जी.एस. बारवकर यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ-पांढरमिसे असे म्हणाले की ,निवडणूक हा लोकशाहीचा सण आहे. सन 2024 मध्ये लोकसभेच्या व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत . या पार्श्वभूमीवर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने उठ मतदारा जागा हो, लोकशाहीचा तू धागा हो या उक्तीप्रमाणे मोठ्यासंख्येने नव मतदार नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आसपा...