इंदापूर: राष्ट्रीय समाज पक्षाचे दिल्ली येथे जंतर-मंतर वर आंदोलन.

आज इंदापूर तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या धरणे आंदोलन संदर्भात निवेदन देण्यात आले . प्रतिनिधि: महेश गडदे (दि). या निवेदनात म्हटले आहे की पाच ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर संपूर्ण देश पातळीवर ओबीसी समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे यामधील मागण्या अशा की येणाऱ्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणे ओबीसी आरक्षण कायम करणे नॉन क्रिमीलेयरचे अट रद्द करणे 50 टक्के सिलिंग हटवणे सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे न्यायव्यवस्था केंद्रीय सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे शेतीच्या धान्य मालाला हमीभावाने खरेदी ची हमी देणे महागाई थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे संपूर्णपणे शिक्षण सक्तीचे व मोफत करणे पूर्ण देशांमध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरवणे अशा दहा मागण्यांकरिता राष्ट्रीय समाज पक्षाने पाच ऑगस्ट रोजी आंदोलन पुकारले आहे. अशा प्रकारचे निवेदन इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष किरण...