पितृछत्र हरपलेल्या 33 विद्यार्थ्यांना आधार सेवा परिवारातर्फे शैक्षणिक मदत.

पितृछत्र हरपलेल्या 33 विद्यार्थ्यांना आधार सेवा परिवारातर्फे शैक्षणिक मदत. इंदापुर प्रतिनिधी महेश गडदे. श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर मधील इयत्ता आठवी ते दहावी मधील पितृछत्र हरपलेल्या 33 विद्यार्थ्यांना आधार सेवा परिवारातर्फे शैक्षणिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विकास फलफले सर होते . शैक्षणिक साहित्य वाटप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास फलफले सर, पर्यवेक्षक श्री अशोक भोईटे सर , आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष श्री अरुण राऊत सर व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले . शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी श्री अरुण राऊत सर , श्री संदीप शहा , श्री नानासाहेब हेगडे , श्री धरमचंद लोढा , डॉक्टर अभिजीत ठोंबरे , डॉक्टर सागर दोशी, डॉक्टर राकेश कर्डिले , श्री दत्तात्रेय यादव, श्री भारत राऊत , सौ. मानसी संजय कुलकर्णी यांनी सहकार्य केले . कार्यक्रमासाठी हायस्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी , सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री सुनील माळी सर यांनी मा...