नगरपरिषद सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचे शासनाचे आदेश.

नगरपरिषद सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचे शासनाचे आदेश. नगरपरिषद सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन वेबसाईटवर प्रसिध्द करा नगरपरिषद प्रशासन संचालकांचे महाराष्ट्र मधील सर्व मुख्याधिकार्यांना आदेश प्रतिनिधि;महेश गडदे. सोलापूर जिल्हा : नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी सर्वसाधारण सभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन ते नगरपरिषदेच्या आणि संचालनालयाच्या वेबसाईटवर सात दिवसात प्रसिध्द करावे, असे आदेश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेच्या सभेत नेमके काय झाले, हे आता नागरिकांना घरी बसल्या बघता येणार आहे. या आदेशाचे दूरगामी परिणाम होणार असून खर्या अर्थाने नगरपरिषदांचे कामकाज नागरिकांसाठी खुले होण्यास सुरुवात झाली आहे. येथील जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे बार्शीचे मनिष देशपांडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. संसद, विधानमंडळाच्या कामकाजाचे सध्या थेट प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे नगरपालिकेसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या नागरी सुविधेशी...