२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार,

पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. प्रतिनिधि-महेश गडदे, यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तसंच लसीकरणाबाबत बैठकीत माहिती जाणून घेतली. या बैठकीत आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क...