इंदापुरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सभासद सहकार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
इंदापुरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सभासद सहकार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. हॉटेल स्वामीराज सभागृहात सेकंडरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत विद्यार्थ्यांनो तुम्ही किर्तीवंत व्हा :- चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे, (ता.५) :- आपले पालक शाळेत अध्यापनाचे पवित्र काम करतात, त्यांना पालक म्हणून तुम्हाला वेळ देता येत नाही,परंतु तुम्हाला घडविणारे शिक्षक तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. पाल्यानों तुम्ही शिक्षण घेत असताना आपल्या पालकांचा सन्मान व्हावा असेच वर्तन करावं,तुम्ही गुणवंत आहातच पण किर्तीवंत व्हा असे गौरवोद्गार मुंबई पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी काढले. ते सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. पाटील म्हणाले की, पतसंस्थेचं राज्यभर जाळं विस्तारलेलं असून २२ शाखा असून सभासद ३२ हजार पेक्षा अधिक आहे . इंदापूरला २०१६- १७ साली शाखा सुरु केली असून १ हजारच्या वर सभासद झाले आहे. ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी व त...