पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रा.दशरथ कुदळे यांनी अनाथ मुलांसोबत वाढदिवस केला साजरा.

इमेज
बारा विद्यार्थाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा - प्रा.दशरथ कुदळे. प्रतिनिधी: महेश गडदे. सध्या वाढदिवसाचे स्तोम फार मोठ्या प्रमाणात वाढले असुन वाढदिवस साजरा करताना फार मोठ्या प्रमाणात पैसा व अन्नाची नासाडी होताना दिसत आहे. परंतु कला, विज्ञान, वाणिज्य विद्यालय येथे कार्यरत असलेल्या प्रा.दशरथ कुदळे यांनी वाढदिवसासाठी इतरत्र होणारा खर्च टाळून त्यांनी आपला वाढदिवस इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथ आश्रम येथे साजरा केला.  प्रा. दशरथ कुदळे हे गेली दहा वर्षापासून श्रावणबाळ आश्रमातील अनाथ मुलांबरोबर आपला वाढदिवस साजरा करत असुन तेथील मुलांना खाऊवाटप व आवश्यक शैक्षणिक साहित्य हि वाढदिवसाच्या निमित्ताने करत आहेत. ‌ सदर उपक्रमाविषयी  प्रा.दशरथ कुदळे यांनी सांगितले कि, वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला तर तेथील मुलांना एक छोटीशी मदत होते, याशिवाय यानिमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याचे सुख हे इतर सर्व सुखापेक्षा श्रेष्ठ असते. आपण आपल्या समाज...