पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नारायणदास हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा.

इमेज
विस वैज्ञानिक प्रयोग व सोळा वैज्ञानिक रांगोळ्या सादर करण्यात आल्या- अरुण राऊत. बातमीदार:- महेश गडदे. इंदापूर.ता.१९: शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर मधील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यामध्ये 20 वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले व 16 वैज्ञानिक रांगोळ्या सादर करण्यात आल्या. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे समन्वयक मदन हराळ पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  मदन हराळ यांनी त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हायस्कूलचे प्राचार्य संजय सोरटे होते. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका शेख मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती जगताप मॅडम, पर्यवेक्षक चांदगुडे, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम यांनी वैज्ञानिक प्रदूषण व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शन प्रमुख म्हणून अरुण राऊत, यांनी काम पाहिले...