उठ तरुणा जागा हो, राष्ट्र उभारणीचा धागा हो,प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे.
उठ तरुणा जागा हो, राष्ट्र उभारणीचा धागा हो,प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे. इंदापूर, (ता,२६) वार्ताहर: महेश गडदे. श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास मंडळाच्या वतीने 26 जुलै हा कारगिल विजय दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जाधव व युवा कार्यकर्ते विक्रमभैया निंबाळकर उपस्थित होते. कार्यकर्माचे प्रास्ताविक उपप्रचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले, त्यावेळी त्यांनी विध्यार्थ्याना कारगिल विजयी दिनाविषयी माहिती दिली,विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. धुळदेव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते. ते म्हणाले, 26 जुलै हा कारगिल विजय दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. कारगिलच्या या युद्धामध्ये लढताना जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्या स्मृतींना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आपले सैन्य सिमेवरती अक्षरशः डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करतात म...