तब्बल दीड वर्षानी शाळेची घंटा खणाणली.
तब्बल दीड वर्षानी शाळेची घंटा खणाणली. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक , पालक , पदाधिकारी यांचेकडून विविध प्रकारे स्वागत. कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन करण्याबाबत प्रशासनामार्फत लेखी सुचना व मार्गदर्शन. प्रतिनिधि:महेश गडदे, दि ६ रोजी कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा राज्य शासनाच्या आदेशान्वये इंदापूर तालुक्यातील इ १ ली ते ४ थीच्या सर्वच शाळा सुरू झाल्या. कोरोना काळात आॕनलाईन / आॕफलाईन , ओसरी वर्ग अशा विविध माध्यमातून शिक्षण सुरू होते. आज प्रथमच शाळेत मुलांचा प्रवेश झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील शिक्षक , पालक , अधिकारी व पदाधिकारी यांनी मुलांना मास्क , गुलाबपुष्प , फुगे , लेखण साहित्य , चाॕकलेट , गोड खाऊ देवून स्वागत केले. महिला शिक्षिकांनी मुलांचे औक्षण केल्याने मुले खूप आनंदून गेली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात शाळेत मुले दाखल झाली.पालकांना शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सुचना दिल्या असून शाळा , वर्ग , परिसर स्वच्छता करणे , मास्क , सॕनिटायजर वापर करणे , एका वर्गात १५ ते २० मुलांना बसवणे , एका बाकावर एक ...